मुंबई : टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या दातृत्वासाठीच त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच भारतरत्न देण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. तसेच सोशल मीडियावर त्यांना भारतरत्न देण्याची मागणी ट्रेंडिंगवर आहे. याच मागणीवर आता खुद्द रतन टाटा यांनी पूर्णविराम लगावला आहे. सोशल मीडियावरील मागणीनंतर रतन टाटा यांनी ट्वीट करून मला भारतरत्न देण्याची मोहिम थांबवा अशी विनंती केली आहे.
While I appreciate the sentiments expressed by a section of the social media in terms of an award, I would humbly like to request that such campaigns be discontinued.
Instead, I consider myself fortunate to be an Indian and to try and contribute to India’s growth and prosperity pic.twitter.com/CzEimjJPp5
— Ratan N. Tata (@RNTata2000) February 6, 2021
कोरोना संकटाच्या काळात रतन टाटा यांनी दीड हजार कोटीची मदत केली. टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे, ती त्यांच्या या देशप्रेम आणि दानशूरपणामुळेच. त्यामुळेच सोशल मीडियावर काल रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी जोर धरत होती. #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग देखील काल ट्रेंड सुरू झाला होता. मात्र आता सोशल मीडियावरील मागणीनंतर रतन टाटा यांनी ट्वीट करून मला भारतरत्न देण्याची मोहिम थांबवा अशी विनंती केली आहे.
मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यासाठी बिंद्रा यांनी ट्विटरवर #BharatRatnaForRatanTata ही मोहिम सुरू केली. या मोहिमेत लोकांना सहभागी होण्याचे आवाहन देखील केले. या नंतर रतन टाटा यांनी सकाळी ट्वीट केले आणि म्हणाले, “मला भारतरत्न मिळावा यासाठी सोशल मीडियावर तुम्ही दाखवलेल्या भावनांचा मी आदर करतो. परंतु माझी एक विनंती आहे की, ही मोहिम थांबवावी. मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगतीसाठी मी माझे योगदान कायम देत राहील”
Ratan Tata believes today`s generation of entrepreneurs can take India to next level. We confer the country`s highest civilian award Bharat Ratna for @RNTata2000
Join us in our campaign #BharatRatnaForRatanTata #RequestByDrVivekBindra@PMOIndia @rashtrapatibhvn @narendramodi pic.twitter.com/U3Wr3aMxJh
— Dr. Vivek Bindra (@DrVivekBindra) February 5, 2021
बिंद्रा यांनी ट्विटरवर #BharatRatnaForRatanTata ही मोहिम सुरू केली.