कोण तिजोरी कुरतडतेय? अत्यंत दुर्दैवी घटना आणि संतापजनक सारे! : आशिष शेलार

मुंबई – मुंबई महापालिकेच्या घाटकोपर राजावाडी येथील रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णायलातील अतिदक्षता विभागातील रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या घटनेनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, ‘सायन रुग्णालयात मृतदेहा शेजारी मुंबईकरांना उपचार घ्यावे लागतात आणि राजावाडीत आयसीयूमध्ये रुग्णांचे डोळे उंदीर कुरतडतात मग 80 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई महापालिकेचे 1 हजार 206 कोटींचे आरोग्याचे बजेट कोण खाते? कोण तिजोरी कुरतडतेय? अत्यंत दुर्दैवी घटना आणि संतापजनक सारे!’

श्रीनिवास यल्लपा असे या 24 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.