ग्रामपंचायती विरोधात दोन तास रास्तारोको

अधिकाऱ्याने दिलेल्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे

अकोले – अकोले तालुक्‍यातील देवठाण ग्रामपंचायतीच्या विरोधात विविध मागण्यांसाठी आज सकाळी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या ठोस आश्‍वासनानंतर दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले. देवठाणचे माजी सरपंच कॉ. एकनाथ सहाणे यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती माजी सदस्य अरुण शेळके, अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे, कम्युनिस्ट नेते कॉ. तुळशीराम कातोरे आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सभामंडप बांधकाम करणे, ग्रामपंचायतीच्या दप्तराचा शोध लावणे, तीर्थक्षेत्र विकासअंतर्गत प्रस्ताव तयार करून पाठवणे, ग्रामसेवकाने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी अरुण शेळके, शिवाजी पाटोळे, तुळशीराम कातोरे, एकनाथ सहाणे, अजय शेळके, भारत सहाणे, केशव बोडके, बाळू गायकवाड, किसन काकड, सुभाष सहाणे, तुकाराम काळे आदींची भाषणे झाली. संजय बोडके, सुभाष काकड, अशोक पथवे, ग्रामसेवक दौलत नवले, तलाठी बाळकृष्ण साळवे, उपसरपंच किसन काकड, विस्तार अधिकारी बी. टी. सरोदे, सा. बां.चे अभियंता पी. एन. वाकचौरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बन्सी टोपले आदी आंदोलकांशी चर्चा केली.
सूत्रसंचालन श्रीकांत सहाणे यांनी केले, तर निवृत्ती जोरवर यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.