पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी पथसंचलनाचे आयोजन धायरी नगर सिंहगड भाग येथे दि.5 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आले होते. धायरी नगर रचनेतील एकूण 370 स्वयंसेवकांनी पथसंचलनात सहभाग घेतला.
जे.के.हिल सोसायटी मागील मैदानात स्वयंसेवकांचे एकत्रीकरण झाले.गणेशनगर मंदिरात माननीय धायरी संघचालक श्री.सचिन नागपुरे यांच्या हस्ते शंखपूजन ध्वजाचे पूजन करून घोषाची मानवंदना देण्यात आली आणि पथसंचलनाला सुरवात झाली.
पथसंचलन जे.के.हिल सोसायटी ते धायरी फाटा व जे.के.हिल सोसायटी ते बेनकर वस्ती या मार्गांवर आकर्षक रांगोळ्या व फुलांच्या पायघड्या घालून पथसंचलनाचे स्वागत जोरदार करण्यात आले तसेच ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.
धायरी नगराचे संघचालक मा. श्री. सचिन नागपुरे कार्यवाह मा. श्री. चेतन होशिंग यांच्यासह स्वयंसेवकांनी पथसंचलनात सहभाग घेतला असून नगरातील समाजसेवक व विविध क्षेत्रातील जोडले गेलेले मान्यवर आणि नागरिक बंधु भगिनींनी ध्वजाचे स्वागत केले.