नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘जॉनी जॉनी येस पापा’ कवितेतून खोचक टीका ट्विटद्वारे केली आहे. ‘जॉनी जॉनी येस पापा’कवितेच्या चालीवर राष्ट्रीय जनता दलान विकास, रोजगार, काळा पैसा, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
आने वाले वक़्त में मोदी भक्तों के बच्चे यही कविता पढेंगे ——–
Modi modi
yes papaAny development?
No papaFarmer happy?
No papaWomen safe?
No papa10 crore job?
No papa15 lakhs??
No papaOnly jumla?
Ha? ha? ha ??????????— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) May 8, 2019
देशातल्या समस्यांशी मोदींना काही देणंघेणं नसून केवळ जुमलेबाजी सुरू असल्याचा टोला कवितेतून लगावण्यात आला आहे. ‘भविष्यात मोदी भक्तांची मुलं ही कविता म्हणतील. मोदी मोदी येस पापा.. अॅनी डेव्हलपमेंट? नो पापा.. फार्मर हॅप्पी? नो पापा… वूमन सेफ? नो पापा… 10 करोड जॉब? नो पापा… 15 लाख? नो पापा… ओन्ली जुमला? हा हा हा…,’ असं ट्विट राजदनं केलं आहे. राजदकडून याआधीही अनेकदा मोदी, भाजपा आणि भाजपाच्या मित्रपक्षांवर निशाणा साधण्यात आला आहे. यापूर्वी राजदचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच देशात राजकीय भूकंप होईल, असं विधान सोमवारी केलं होतं