पुणे : पश्चिम महाराष्ट्र हा बाजपाचा बालेकिल्ला कायम राखण्यात राष्ट्रवादी कॉंगेसला यश आल्याचे प्राथमिक फेऱ्यांतील चित्रावरून स्पष्ट होत आहे. मात्र काही ठिकाणी भाजपाने शिरकाव केल्याचे चित्र आहे. 79 वर्षीय शरद पवार यांनी पिंजून काढलेल्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपा सेनेला टक्कर देत असल्याचे चित्र आहे.
छत्रपती शिवाजी महारांजांचे 13 वे वंशज उदयनराजे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना सातारकरांनी नाकरल्याचे स्पष्ट झाले. तेथे श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्यावर सुमारे लाख मतांची आघाडी घेतली. त्यामुळे या मेगाभरतीचा फायदा होण्याऐवजी भाजपाचे नुकसान झाल्याचे चित्र सामोर येत आहे.
2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांना भाजपाने आव्हान दिले होते. कॉंग्रेस राष्ट्रवादी त्यावेळी स्वतंत्र लढले होते. या 66 जागांपैकी राष्ट्रवादीला 28 तर भाजपला 22 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेने 12 जागांवर भगवा फडकावला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचाराने हा भाग पिंजून काढला होत. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या बलशाली नेत्यांना भाजपात घेऊन राष्ट्रवादीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता.