राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

 कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाला कुलूप ; संगीता खाडे यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

कोल्हापूर: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळती मध्ये कोल्हापूर देखील आग्रक्रमावरती आहे. कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूरच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठविला आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यालय देखील आता बंद झाल आहे. हे कार्यालय संगीता खाडे यांच्या निवासस्थानानजीकच्या जागेत होते. परंतु त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचे जिल्हा कार्यालयाला देखील कुलूप ठोकण्यात आलं आहे.

पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यात अनेकांना संधी देत आमदार, खासदार, मंत्री केलं. परंतु आता राष्ट्रवादीलाच घरघर लागल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र त्या भाजपच्या संपर्कात असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, गेले काही महिने त्या जिल्हा राष्ट्रवादीमधील घडामोडींवरुन नाराज होत्या. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या त्या निकटवर्तीय समजल्या जातात. दहा वर्षे त्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून त्या जिल्हा नेतृत्वावर नाराज होत्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्या पक्षात कार्यरत होत्या. प्रदेश सरचिटणीस, उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. पक्षाचे जिल्हा कार्यालय गेली वीस वर्षे त्यांच्या निवासस्थाना नजीकच्या जागेत होते. त्या खोल्यांची डागडुजी करायची असल्यामुळे कार्यालय अन्यत्र हलवावे, असेही त्यांनी पक्षाला कळविले होते. त्यांच्या जागेतील कार्यालय पक्षाने अन्यत्र हलविले आहे. हे राज्यातील पाहिलं कार्यालय असून खुद्द शरद पवार यांनी या कार्यालयाच उदघाटन केलं आहे.

सध्या या कार्यालयाच्या आवारात राष्ट्रवादीचे असणारे बॅनर आणि पोस्टर काढून एका कोपऱ्यात ठेवण्यात आलेल्या आहेत तर याच परिसरात असणाऱ्या पत्र्याची डागडुजीचे काम सुरू झाल आहे. कार्यकर्त्यांचं बलस्थान असणार हे राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालय बंद झाल्यामुळे बालेकिल्ल्याला सुरुंग लागायची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे याचे परिणाम आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र नक्कीच जाणवतील असं चित्र निर्माण झाला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.