Rashmika Mandanna Video | अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘पुष्पा 2’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. यातील तिच्या ‘श्रीवल्ली’ भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अलीकडेच रश्मिकाला जिममध्ये पायाला दुखापत झाली होती. रश्मिकाने स्वतः एक पोस्ट शेअर करत तिच्या पायाच्या दुखापतीची माहिती दिली होती. आज ती हैदराबादहून मुंबईला जात असताना विमानतळावर स्पॉट झाली.
तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून हैदराबाद विमानतळावर तिला व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागल्याचे दिसले. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती पिंक चेक्स स्वेटशर्ट, ब्लू जीन्स, डोक्यावर हॅट आणि तोंडाला मास्क लावून ती कारमधून उतरली. समोरच ठेवलेल्या व्हीलचेअरवर जाण्यासाठी ती लंगडत जाताना दिसली. Rashmika Mandanna Video |
View this post on Instagram
व्हिलचेअरवर बसल्यावर कॅमेऱ्याकडे न पाहता ती मान खाली घालून केवळ मोबाईलमध्येच पाहत होती. रश्मिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओवर ‘ओव्हरअॅक्टिंग’ अशी कमेंट केली आहे. तर चाहत्यांनी तिच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे. Rashmika Mandanna Video |
लवकरच रश्मिका आगामी ‘छावा’ सिनेमात दिसणार आहे. विकी कौशल सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय रश्मिका सलमान खानसोबत ‘सिकंदर’ चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त होती. याच वेळी तिच्या पायाला दुखापत झाल्याने सिनेमाचे शूटही पुढे ढकलण्यात आले. Rashmika Mandanna Video |
हेही वाचा:
Pune : चुकून रिव्हर्स गिअर टाकला अन् पार्किंगमधून गाडी थेट…; विमानगरमधील ‘या’ भागात नेमकं काय घडलं?