नायक अथवा नायिका होणे सोपे नाही. पूर्वी केवळ चांगले दिसण्यावर काही कलाकारांची वर्णी लागलीही असेल. मात्र हल्ली चित्रपटसृष्टीत एन्ट्री करायची म्हटली तरी फार तयारी करावी लागते. आई किंवा वडील स्टार अथवा मोठे दिग्दर्शक असले तरी सगळ्यांना कष्ट हे घ्यावेच लागतात. त्याशिवाय चित्रपट चालत नाही व प्रेक्षक डोक्यावर घेत नाहीत. मात्र आजही काही जण असे नशिबवान होत की त्यांना थेट एन्ट्री मिळाली. तीही वेगवेगळ्या भाषांतील चित्रपटांत आणि त्याहून महत्त्वाचे चित्रपटात काम मिळण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट असलेली ऑडिशन न देताच. अशा भाग्यवान कलाकारांपैकीच एक आहे रश्मिका मंदाना.
View this post on Instagram
रश्मिका साउथची मोठी स्टार झाली आहे. आज केवळ तिकडेच नाही तर देशभरात तिला ओळखले जाते. मात्र रश्मिका म्हणते तिला काही ऍक्ट्रेस वगैरे व्हायचे नव्हते. मुळात ते तिचे लक्ष्यच नव्हते. त्यामुळे तिने ऍकिंटग शिकण्याचा प्रयत्नही केला नाही. एका फॅशन शोमध्ये तिने भाग घेतला होता. त्यात ती विजेती ठरली व वर्तमानपत्रात तिचा फोटा छापून आला. तो कन्नडच्या एका दिग्दर्शकाने पाहिला व त्यांनी थेट तिला नायिकेच्या भूमिकेची ऑफर केली. त्यासाठी ऑडिशन द्यावे लागले नाही.
View this post on Instagram
असेच काहीसी पहिल्या तेलगू आणि तमिळ चित्रपटांच्या बाबतीत झाले. कोणीतरी तिचे काम कुठेतरी पाहिले अन् तिला प्रस्ताव येत गेले. हिंदीतही ती लवकर पदार्पण करणार आहे. जे दोन चित्रपट तिला येथे मिळाले आहेत तेथेही तिला ऑडिशन अथवा वशिलेबाजीची गरजच पडली नाही. या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी तिचे गाजलेले साउथचे चित्रपट रिमेक करण्याचे ठरवले आहे. त्यातील तिचे काम पाहिले आहे व त्यातूनच त्यांनी तिला चित्रपट ऑफर केले. त्यामुळे बॉलीवूडमध्ये प्रवेशासाठीही तिला काही खास करावे लागले नाही.