मुंबई : बॉलिवूड जगतातील अनेक दिग्गज कलाकार इन्साग्रामवर सक्रिय आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि हॉट नट्यासुद्धा मागे नाहीत. वेगवेगळ्या आऊटफीटमधील फोटो तसेच डान्सचे व्हिडीओ अपलोड करून अनेक नट्या कायमच चर्चेत राहतात. यामध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरणारी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध नटी रश्मी देसाईचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.
ती आपल्या चाहत्यांसठी भुरळ घालणारे फोटो तसेच व्हिडीओ सातत्याने अपलोड करत असते. सध्या असाच एक हॉट व्हिडीओ तिने अपलोड केला आहे. छोट्या स्कर्टमधील तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.
रश्मी देसाईने बिग बॉस सिझन 13 मध्ये सहभाग नोंदवल्यानंतर ती चर्चेत आली. इन्साग्रामवर तिचे तब्बल 42 लाख फॉलोवर्स आहेत. तिने पोस्ट केलेल्या एका फोटोला लाखोंनी लाईक्स मिळतात. सध्या तिने आपल्या चाहत्यांसाठी हॉट आणि इरॉटिक डान्सचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका बंद शटरच्या मागे दिलखुलासपणे डान्स करताना दिसतेय.
https://www.instagram.com/p/COkN5x5AasC/?utm_source=ig_web_copy_link
व्हिडीओमध्ये ती निळ्या कलरच्या शॉर्ट स्कर्टमध्ये दिसतेय. तसेच शॉर्ट फ्रिल असणारा ऑफ शोल्डर टॉप घातल्यामुळे तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली आहे. शॉर्ट स्कर्ट आणि ऑफ शोल्डर टॉपमध्ये तीने डान्स केल्यामुळे ती अतिशय हॉट दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये तिने गाण्यावर घेतलेले ठुमकेसुद्धा तिच्या चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत. ती या व्हिडीओमध्ये कार्डी बीने गायलेल्या ‘I know That’s Right’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय.
एकीकडे रश्मीच्या या हॉट डान्समुळे धुमाकुळ माजला आहे. तर दुसरीकडे तिने घातलेल्या शॉर्ट स्कर्टमुळे तिचे काही चाहते नाराजसुद्धा झाले आहेत. तिच्या या व्हिडीओखाली अनेकांनी नापसंती व्यक्त केली असून अशा छोट्या कपड्यांमध्ये डान्स करणे शोभत नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. एका चाहत्याने तर डान्स करताना स्कर्ट वर जात असल्याचेसुद्धा भान नाही, अशी खोचक टिप्पणी केली आहे.