भारतीय फलंदाजांसमोर रशिद प्रभावी ठरेल – जॉनी बेअरस्ट्रो

लंडन: अदिल रशिदने ज्याप्रकारे एकदिवसीय स्पर्धेत भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे त्याच प्रमाणे तो कसोटी मालिकेतही प्रभावी कामगीरी करेल असा विश्‍वास इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्ट्रोने व्यक्त केला आहे.

रशिदने आपल्या कसोटी क्रिकेट मधुन सन्यास स्विकारला असतानाही त्याला कसोटी संघात स्थान देण्यावरुन इंग्लंडच्या आजी – माजी खेळाडूंनी संघ व्यवस्थापनावर टिका केली असताना बेअरस्ट्रोने केलेले हे विधानाधिक महत्वपूर्ण आहे. कारण रशिदने आपला शेवटचा कसोटी सामना हा डिसेंबर 2016 मध्ये खेळला होता तसेच त्यानंतर त्याने स्थानिक काऊंटी क्रिकेट मध्येही सहभाग नोंदवला नव्हता कसोटी संघामध्ये निवड होण्यासाठी स्थानिक चार दिवसीय काऊंटी हंगामात सहभागी होणे आवश्‍यक असते मात्र रशिदने यंदाच्या हंगामात एकही सामना खेळला नव्हता त्यामुळे त्याच्या निवडी वरून सध्या वादंग माजला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बेअरस्ट्रोहा रशिद सोबत यॉर्कशायर क्‍लब तर्फे खेळतो, त्याने सध्या सुरू असलेल्या वादा बाबत शांत रहाणेच पसंत केले मात्र त्याने रशिदची निवड ही त्याच्या एकदिवसीय संघातील कामगीरीच्या बळावर करण्यात आल्याचेही सांगितले. त्याच बरोबर त्याच्या सोबत आगामी कसोटी सामण्यात खेळण्याबाबत उत्सूक असल्याचेही त्याने सांगीतले.

बेअरस्ट्रो यावेली पुढे बोलताना म्हणाला की, इंग्लंडच्या कसोटी संघात निवड होणे हा तुमच्या जीवनातील सर्वात महत्वाचा क्षण असतो त्याच बरोबर आपली निवड सार्थ करुन दाखवणे ही देखिल खुप मोठी जबाबदारी असते. रशिद समोर आपली निवड सार्थ ठरवीने हे खुप मोठे आव्हान असणार आहे. कारण एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट यामध्ये खुप फरक आहे.

एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजांना चेंडू समजावून घेण्यास कमी वेळ असतो तर कसोटी मध्ये फलंदाज आपला संपुर्ण वेळ घेऊन चेंडू समजून फलंदाजी करत असतो त्यामुळे रशिदला कसोटी मध्ये स्वताःला सिद्ध करणे अवघड जाणार आहे.

दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात रशिदने विराट कोहलीला अप्रतीम चेंडूवर चकवताना आऊट केले होते, या चेंडू नंतर रशिदवर सर्वच स्तरातून कौतूक होत आहे, तसेच त्याने भारता विरुद्धच्या एकदिवसीय मालीकेत तीन सामन्यात सहा बळी मिलवत आपल्या गोलंदाजीची चमक दाखवून दिली होती. त्यामुळे कसोटी मालिकेत त्याची निवड करण्यात आली आहे. मात्र त्याच्या केवळ एकाच चेंडूमुळे त्याची निवड करण्यात आले नसून त्याने आता पर्यंत खुप चांगली गोलंदाजी करताना अनेक सामन्यांमध्ये इंग्लंडला विजय मिळवून दिला आहे तसेच त्याने मला अनेक वेळा गोलंदाजी केली असल्याने मला त्याच्या गोलंदाजीची खोली माहित आहे असेही बेअरस्ट्रो यावेळी म्हणाला.

याच बरोबर पुढे बोलताना बेअरस्ट्रो म्हणाला की, जरी रशिद गेल्या वर्षभरापासून कसोटी क्रिकेट अथवा स्थानिक चार दिवसीय क्रिकेट खेळला नसला तरी तो क्रिकेटच्या या स्वरूपातील चांगला खेळाडू असुन त्याला पुनरागमन करताना अडचण होणार नाही असा विश्‍वासही त्याने व्यक्त केला आहे. कारण त्याला त्याच्या लेग स्पीन ला अथवा गूगलीला नियमीत दहा षटकांपेक्षा जास्त वेळा टाकावे लागनार आहे इतकाच क्‍लाय तो फरक कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या स्वरूपात आहे त्यामुळे त्याला कसोटी मालिका अवघड जाणार नाही याची अम्हाला खात्री असून या मालिकेत तो आमच्या साठी खुप उपयुक्त खेळाडू ठरेल याचा आम्हाला विश्‍वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)