रशीदने निवृत्ती स्वीकारल्याने निराश झालो होतो- गॉफ

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघात फिरकी गोलंदाज अदिल रशीदची निवड करण्यात आल्यावरून सुरू झालेले वादळ अजून शमलेले नाही. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गॉफ रशीदच्या निवडीचे स्वागत करताना म्हणाला की, अदिल रशीदने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला होता, तसेच त्याने यॉर्कशायर संघासोबतचा कसोटी सामन्यांच्या वेळेचा करारदेखील रद्द केला होता, त्यामुळे मी खूप निराश झालो होतो.

या पार्श्‍वभूमीवरही इंग्लंडच्या निवड समितीने त्याची कसोटीसाठी निवड करून सुखद धक्‍का दिला आहे. मला आशा आहे की रशीदने आपल्या कामगिरीत सातत्य राखल्यास त्याचे कसोटी संघातील स्थान पक्‍के होईल, कारण सध्याच्या गडीला रशीद हा आमच्या संघातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. त्याचबरोबर रशीदच्या ऐवजी डॉम बेस किंवा जॅक लीच या गोलंदाजांची निवड केली गेली असती, तर ते भारतीय फलंदाजांना बांधून ठेवण्यात अपयशी ठरले असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मर्यादित षटकांच्या मालिकेत ही बाब सिद्ध झाली आहे. रशीदनेही पुनरागमनाची तयारी केली असल्याचे ऐकून मला आनंद झाला आहे. इंग्लंडला तो या मालिकेत निश्‍चितच यश मिळवून देऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)