रोहतक – हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील निंदना नावाच्या गावात एका शेतात खोदकाम सुरू असताना अतिशय विचित्र अशा विटा सापडल्या असून या विटांचे एकूण आकारमान पाहता त्या खूप जुन्या असाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
एका विटेचे वजन 16 ते 17 किलोग्रॅम असून त्याची लांबी 10 इंच आणि उंची चार इंच आहे. काम सुरू असताना अनेक विटा सापडल्या असल्या तरी त्यापैकी काही विटा तुटून गेल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले प्रत्येक विटेवर मधोमध तीन समांतर रेषा असून यांची रचना ही अतिशय वेगळी आहे. कार्बन डेटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून या विटांचे वय लवकरच शोधण्यात येणार आहे.
निंदना गावातील सुरेंद्र या शेतकऱ्याच्या शेतात हा सगळा प्रकार घडला सुरेंद्रने वीटभट्टी चालवणाऱ्या एका व्यक्तीला या शेतातील माती घेऊन जाण्याचे काम दिले होते. हे माती घेण्यासाठी खोदकाम सुरू असतानाच या विटा अचानक सापडल्या यंत्राच्या साह्याने मातीचे खोदकाम सुरू असल्याने काही विटा जरी मोडून पडल्या तरी पाच सहा विटा संपूर्णपणे सुस्थितीत असून त्या सुरेन्द्रने आपल्या घरी आणून ठेवल्या आहेत.
या विटा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली असून अशा प्रकारच्या विटा आम्ही कधीही पाहायला नाहीत असे असे त्यांनी म्हटले आहे. या विटा सापडल्या त्या ठिकाणी पुरातन कालावधीत एखादी वस्ती असू शकते असे काही लोकांचे म्हणणे आहे लवकरच पुरातत्व खात्याला माहिती दिली जाणार असून त्यानंतर विटांचे गुढ उकलले जाईल अशी आशा व्यक्त होत आहे.