मीना कुमारीच्या “पाक़िजा’चे दुर्मिळ फुटेज मिळाले

फिल्म अर्काईव्हजकडे जत करणार खजिना

साठ ते सत्तरच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आणि “ट्रॅजिडी क्वीन’ मीना कुमारी हिने तिचा काळ खूपच गाजवला होता. तिच्या “कोहिनूर’, “फूल और पत्थर,’ “काजल’, “दिल अपना और प्रित पराई,’ “बैजू बावरा’ यासह “साहिब बिबी और गुलाम’ अशा अनेक चित्रपटांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.

वर्ष 1972 च्या पूर्वार्धात लोकप्रिय झालेल्या मीना कुमारीच्या “पाक़िजा’ या चित्रपटाचे दुर्मिळ फुटेज आता मिळाले असून ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. कमाल अमरोही दिग्दर्शित या चित्रपटात एक अमर प्रेमकहाणी साकारण्यात आली होती. मीना कुमारी समवेत राजकुमारची भूमिकाही तितकीच तोलामोलाची होती.

विशेष म्हणजे हा चित्रपट एक म्युझिकल हिटही ठरला होता. “थाडे रहियो…’ “कोई पत्थर से ना मारे मेरे दिवाने को…’ “चलते चलते युंही कोई मिल गया था…’ “मौसम हैं आशिकाना…’ आणि “इन्ही लोगों ने…’ अशा सदाबहार गाण्यांनी बॉक्‍स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

त्यातील “इन्ही लोगों ने…’ या गाण्याच्या चित्रीकरणाचे बरेसचे फुटेज चित्रपट संग्रहालयाला मिळाले आहे आणि हे फुटेज आपण जतन करुन प्रेक्षकांपर्यंत लवकरच पोहोचवणार असल्याचेही सांगितले आहे. फिल्मवर काही ठिकाणी स्क्रॅचेस आहेत तर काही ठिकाणी रंग उडाल्याचे दिसत असले तरी हा एक मोठा खजिनाच गवसल्याचे संग्रहालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

वर्ष 1956 मध्ये चित्रीकरण सुरु झालेल्या या सिनेमाला सिनेमागृहात जायला तब्बल 16 वर्षे लागली होती. या चित्रपटात अशोक कुमार, राज कुमार, नादिरा, वीणा आणि डीके सप्रू मुख्य भूमिकेत आहेत. मात्र, चित्रपटाचे घवघवीत यश पाहण्यापूर्वीच मीना कुमारी यांचे “पाकीजा’च्या प्रदर्शनानंतर काही आठवड्यांतच 31 मार्च 1972 रोजी निधन झाले

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.