“एफटीआयआय’मध्ये 76 वर्षांनी सापडले दुर्मिळ प्रमाणपत्र

येत्या काळात प्रभात चित्रपट संग्रहालयात प्रमाणपत्र ठेवण्यात येणार

पुणे – फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील प्रभात स्टुडीओत “रामशास्री’ या चित्रपटाचे प्रमाणपत्र तब्बल 76 वर्षांनी सापडले आहे. येत्या काळात हे प्रमाणपत्र प्रभात चित्रपट संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.

फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) प्रभात स्टुडीओमधील फारसा वावर नसणाऱ्या भागाची साफसफाईचे काम करताना कला दिग्दर्शन आणि निर्मिती आरेखन विभागाचे सहायक प्राध्यापक आशुतोष कविश्‍वर यांना हे प्रमाणपत्र सापडले.

बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनने “रामशास्री’ या चित्रपटाला 1944 मधील सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचे प्रमाणपत्र दिले होते.

या प्रमाणपत्रावर असोसिएशनच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत. प्रभात फिल्म कंपनीचा “रामशास्त्री’ हा पहिला जीवनमांडणी करणारा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत 30 जून 1944 रोजी प्रदर्शित झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.