नवी दिल्ली – लॉकडाऊन उद्भवल्यानंतर केंद्राने लघुउद्योगांना बॅंकांनी कर्जपुरवठा करावा, असे सांगितले होते. त्यानुसार 20 जूनपर्यंत बॅंकांनी लघुउद्योजकांना 79 हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.
त्यापैकी 35 हजार कोटी अगोदरच लघुउद्योजकांना वितरित करण्यात आलेले आहेत. अर्थ मंत्रालयाने याकामी पुढाकार घेतला असून यावर देखरेख ठेवली जात आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत सरकारने 3 लाख कोटी रुपयांच्या कर्जाला शंभर टक्के हमी दिलेली आहे.
लघुउद्योजकांना अगोदर घेतलेल्या कर्जाच्या 20 टक्के कर्ज हमीशिवाय उपलब्ध होणार आहे. सरकारी बॅंकांबरोबरच खासगी बॅंका हे कर्ज मंजूर करीत आहेत. ज्या बॅंकांनी कर्ज मंजूर केले आहे, त्यामध्ये स्टेट बॅंक, एचडीएफसी बॅंक, बॅंक ऑफ बडोदा. पंजाब नॅशनल बॅंकेचा समावेश आहे.