सहारनपूर : बलात्काराला विरोध केला म्हणून नवऱ्याने तीन तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार चिलकाना या गावात घडला आहे. एका महिलेने तिचा नवरा जावेद आणि त्याच्या लहान भावावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. बलात्काराचा विरोध केल्यानंतरत तीन तलाक दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.
पोलिसांनी सांगितले कि, या महिलेलने तिच्या नवऱ्या आणि देर समरुन यांच्याविरोधात तक्रार केली असून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याची लेखी तक्रार दिली आहे. घटनेचा विरोध केल्यानंतर सदरील महिलेला मारहाण करून घटस्फोट दिला आहे .
पोलिसांनी महिलेचा पती जावेद, देर समरुन, सासू इशाराणा, सासरा हारून यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.