चित्रकुट – उत्तरप्रदेशात एक अल्पवयीन दलित मुलीवर तीन जणांनी बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर सदर मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या मुलीने आपल्या माणिकपूर भागातील घरातच गळफास लाऊन आत्महत्या केली.
या मुलीचे 8 ऑक्टोबर रोजी अपहरण करून तिच्यावर जवळच्याच जंगलात तीन जणांनी सामुहिक बलात्कार केला होता.
या मुलीच्या आई वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी माजी सरपंचाचा मुलगा किशन उपाध्याय आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्यावर पोस्को सह अन्य गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर मुलीच्या पोस्ट मार्टेम अहवालात मात्र तिच्यावर बलात्कार झाल्याचे दिसून आले नाही असे पोलिसांनी म्हटले आहे. या मुलीला जंगलातच हातपाय बांधलेल्या अवस्थेत सोडून देण्यात आले होते, पोलिसांनीच तिला घरात आणून सोडले; पण त्यांनी त्यावेळी कोणताही गुन्हा दाखल केलेला नव्हता.