जालना – बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द येथे अनाथ अल्पवयीन मुलींवर दोघांनी मिळून अत्याचार केल्याची धक्कादाक घटना घडली आहे. अत्याचार करुन त्याची शुटींग मोबाईल मध्ये या दोन नराधामांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
सोपान ढाकणे व शंभू ढाकणे असे आरोपीचे नावे आहे. बदनापूर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच या दोघांना अटक केली आहे. व गुन्हा दाखल केला आहे.
या अल्पवयीन अनाथ मुलीला शेजारच्या शेतात फरफडत नेऊन तीचे तोड दाबून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार या दोघांनी केला आहे. तसेच या घटनेबाबत सांगितल्यास मोबाईलमध्ये शुटींग करून बदनाम करण्याची धमकीही यांनी दिली आहे. ही अनाथ मुलगी येथील एका मंदिराच्या पुजाऱ्यानी दत्तक घेतलेली होती.