संतापजनक! सरकारी शाळेच्या शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार

पन्ना – मध्य प्रदेशातील पन्ना येथे सरकारी शाळेच्या शिक्षकाने एका 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. पीडिताच्या वडिलांनी अजयगढ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस तपास करत आहेत.

पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, त्यांच्या 13 वर्षीय मुलीवर सरकारी शाळेच्या 50 वर्षीय शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. मुलगी तिच्या भावाला बोलवण्यासाठी शिक्षकाच्या घरी गेली होती. आरोपी शिक्षकाने तिच्या भावाला पाठवले पण तिला तिथेच रोखून धरले आणि तिच्यावर अत्याचार केला.

घरी परतल्यानंतर पीडित मुलीने शिक्षकाने अत्याचार केल्याची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आपल्या समाजातील लोकांना एकत्र करत पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि पाॅक्सो कायद्याअंतर्गत शिक्षकावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या संतापजनक घटनेनंतर गावातील लोक आक्रमक झाले आहेत.

पन्ना येथील अॅडिशनल एसपी परिहार यांनी सांगितले की, आरोपी शिक्षकाविरोधात अयजगढ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. पुढील तपास सुरू आहे, असे एसपी परिहार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.