पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयाकाविरुध्द समर्थ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या समन्वयाविरुद्द नुकताच एक ऍट्रोसिटीचाही गुन्हा दाखल झाला होता. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
सुनिल मधुकर जगताप(52,रा.मुंढवा), कोमलसिंग डोगरसिंग वाणी(45,रा.मुंढवा), राजेश काळूराम गायकवाड(43,रा.खराडी), बबीता बबन पगारे(60,रा.चंदननगर) अशी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींची नावे आहेत. बलात्कार , फसवणूक आणी शिवीगाळ आदी कृत्यासंदर्भात गुन्हा नोंदवला गेला आहे. याप्रकरणी खराडी येथील एका 45 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी महिलेचा पती समाजसेवक आहे. त्यांची मोठ्या प्रमाणात शहरात जमिन आहे.
या जमिनी संदर्भात त्यांच्या पतीने न्यायालयात येणे जाणे होते. तर आरोपी सुनिल जगताप याचेही एका जमिनीच्या प्रकरणासंदर्भात न्यायालयात येणे जाणे सुरु होते. यातून दोघांची ओळख झाली होती. या ओळखीतून सुनिल जगताप फिर्यादीच्या घरी येत जात होता. दरम्यान फिर्यादीच्या पतीचे तीघा बांधकाम व्यवसायिकांसोबत एका जमिनीचे वाद सुरु होते. या वादासंदर्भात सुनिल जगताप यांना माहिती झाली होती. त्यांनी फिर्यादीच्या पतीशी वाद सोडवून जागा विकसीत करुन देतो असे बोलने केले होते.
मात्र त्यांच्या पतीने त्यात इंटरेस्ट दाखवला नाही. यामुळे त्याने फिर्यादीला मोबाईलवर कॉल करुन तुमचा पती पुढाकार घेत नाही. तुम्ही पुढाकार घ्या मी माझ्या ओळखीच्या एका बांधकाम व्यवसायीकाच्या माध्यमातून तुमची जागा विकसीत करुन देतो असे आमिष दाखवले. यानंतर त्यांना भेटायला सोमवार पेठेत बोलावून घेतले. तेथे एका गॅरेजच्यावरती असलेल्या कार्यालयात बलात्कार केला. या या बलात्काराच्या घटनेच्यावेळी कार्यालयात कोमलसिंग, राजेश आणी बबीता हे उपस्थित होते. हा प्रकार 2016 दरम्यान घडला होता. यानंतर सन 2019 पर्यंत वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिर्यादीला धमकावत बलात्कार केला. टोयाटो गाडीत जबरदस्तीने बसवून धमकावून विनयभंगही केला. तसेच पतीच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकीही दिली.