धार (मध्य प्रदेश) – कॉंग्रेसचे आमदार आणि मध्य प्रदेशचे माजी मंत्री उमंग सिंघर ( Umang Singhar ) यांच्यावर मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात त्यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या एका महिलेचा मानसिक छळ आणि बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार केली असून त्यानुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंघर यांनी लग्नाच्या बहाण्याने आपल्या इच्छेविरुद्ध वारंवार बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तसेच आमदाराने आपला मानसिक छळ केला, असेही या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. जेव्हा या महिलेने आमदार सिंघर यांना आपण तुमच्या विरोधात पोलिसांत तक्रार देणार आहोत असे सांगितले तेव्हा त्यांनी भोपाळमध्ये 16 एप्रिल रोजी तिच्याशी विवाह केला असे तिचे म्हणणे आहे.
#GujaratElection : प्रचारसभेत राहुल गांधींचा भाजपावर आरोप; म्हणाले “आदिवासींचे हक्क हिरावून…”
लग्नानंतर सिंघर यांच्या वागण्यात बदल झाला आणि त्याने तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. तिच्या तक्रारीनुसार, त्यांच्या लग्नाच्या दोन महिन्यांनंतर त्यांनी आपल्यावर बलात्कार केला आणि मारहाण केली,तसेच अश्लील व्हिडिओ बनवला आणि ब्लॅकमेल केले असे तिने म्हटले आहे. 48 वर्षीय सिंघर हे मध्य प्रदेश विधानसभेतील गंधवानी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कार्यकाळात ते राज्याचे माजी वनमंत्री होते.