बलात्कार थांबू शकत नाही; भाजप मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य 

नवी दिल्ली – राजस्थानचे माजी मंत्र्यांनी बलात्कारप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बलात्कार अशी गोष्ट आहे जी थांबू शकत नाही. परंतु, बलात्काराच्या घटनांमध्ये ८७ टक्के वाढ चिंताजनक आहे, असे भाजपच्या मंत्र्यांनी म्हंटले आहे. भरतपूरमधील एका भाजपच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

भाजपचे माजी मंत्री कालीचरण सराफ यांनी म्हंटले कि, जयपूरमधील चिमुकलीशी लैंगिक अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक आहे. राज्यात कायदा-व्यवस्था राखण्यात काँग्रेस सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. ते पुढे म्हणाले, भाजपच्या कार्यकाळातही अशाप्रकारच्या घटना होतात. परंतु, त्यावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आणले आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.