पुणे – फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या व्यक्तीने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बारामती येथील 34 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनूसार पंकज रामनाथ उदावंत(रा.साई चौक, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पंकजने बारामती येथील एका महिलेस पेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यांची ओळख वाढल्यानंतर पंकजने तीला पुण्यात भेटायला बोलावले होते. ती पुण्यामध्ये आल्यावर पंकजने तीला बहिणीच्या घरी ठेवले होते. घरी कोणी नसताना तीला एका रुममध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.
यानंतर ती गणपती पहायला आल्यावर आरोपीच्या घरी रहायला आली होती. यावेळीही त्याने तीच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. यावेळी त्याने तीची अश्लिल छायाचित्रेही काढली होती. ही छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तीच्याशी वारंवार शरीरीक संबंध ठेवत होता.
तीने नकार दिल्यावर त्याने ही छायाचित्रे तीचा भाऊ व इतरांना पाठवली. फिर्यादी महिलेने बारामती पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर बारामती पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यात दाखल होऊन तीला फिर्याद देण्यास लावले. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.