बलात्कार, माफी अन् पीडितेशी लग्न; आता केली हत्या, चतूर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

नवी दिल्ली – देशात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. उत्तराखंडमधील डाबडी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  येथे आरोपीने स्वत:च्या पत्नीला लस घेण्याच्या बहाण्याने डोंगरावर नेऊन ढकलून दिलं. यात तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, डाबडी येथील पीडित तरुणीचे शेजारी राहणाऱ्या आरोपी तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. मात्र आरोपीने तरुणीला लग्न करण्यास नकार दिला. यामुळे पीडितेने जुलै २०२० रोजी त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली.

तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर आरोपीने तरुणीची माफी मागत लग्न करण्याचीही तयारी दर्शवली. तरुणीनेही त्याला माफ केले. त्यानंतर तिने आरोप मागे घेतले. यामुळे न्यायालयाने देखील आरोपीची सुटका केली. अखेरीस दोघांनी ऑक्टोबर २०२० मध्ये लग्नही केले.

दरम्यान लग्नानंतर आरोपी तरुणीला मारहाण करत होता. आरोपी पतीने पश्चातापातून नव्हे तर केवळ तुरुगांतून सुटका व्हावी यासाठी आपल्याशी लग्न केल्याची बाब तरुणीच्या लक्षात आले. यामुळे ती माहेरी निघून गेली. त्यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला. ७ जून रोजी झालेल्या भांडणात तरुणीने आरोपीला पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली. यामुळे पत्नीचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय आरोपी पतीने घेतला.

माहेरी असलेल्या पत्नीची समजूत काढून आरोपीने तिला घरी आणले. त्यानंतर करोना लस घेण्याच्या बहाण्याने तो तिला घेऊन डोंगरभागात गेला आणि त्याने तिला तिथून ढकलून दिले. यात पीडितेचा मृत्यू झाला. पोलीस तपासात आरोपीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.