मंदावलेल्या पत्रीपुलावर वेगवान ‘रॅप’

आजच्या व्हायरल व्हिडीओ कट्ट्यावर आज आपण जाणून घेणार आहोत कल्याणकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि तितक्‍याच त्रासाचा बनलेल्या पत्रीपुलबाबत. या पुलाच्या कामाबाबत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यातच आता कल्याणच्या तरुणाच्या भन्नाट रॅप सॉंगची भर पडली असून या समस्येला पुन्हा एकदा वाचा फोडली आहे. हे रॅप सॉंग यु ट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या रॅप सॉंगमधून ‘पत्रीपूल कब बनेगा, मै तो लडेगा इस रॅपकी आवाज से’ असे आव्हान एका तरुणाने दिले आहे. हे रॅप सॉंग कल्याणमधील ‘रवी सिंग’ या तरुणाने तयार केले आहे. रवीने यापूर्वीदेखील अनेक सामाजिक विषयांवर देखील रॅप सॉंग व्दारे भाष्य केले आहे. आणि ते प्रचंड व्हायरल देखील झाले आहे. रवीला कामानिमित्त दररोज लोकल प्रवास करण्यासाठी पत्री पुलावरून ये-जा करावी लागते. यामुळे रवीने तातडीने या मुद्द्याला हात घालत हे गाणे स्वत:वरच चित्रित केले. ‘पत्रीपूल कब बनेगा’ सॉंग मधून रवीने प्रशासनाची निष्क्रियता मांडत प्रशासनाला जाब विचारला आहे.

धोकादायक असलेला ब्रिटिशकालीन पत्रिपूल तोडल्यानंतर त्या जागी नव्याने पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. पत्री पुलाशेजारी असलेल्या दोन पदरी पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली असून यामुळे कल्याण मधील नागरिकांना गेल्या वर्षभरापासून प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ कल्याणकरांच्या चांगलाच पसंतीला उतरला असून, याला युट्युब प्रचंड लाइक्‍स मिळत आहेत..

-ऋषिकेश जंगम

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.