हार्दिक पांड्यामुळे रणवीर सिंह गोत्यात

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या वेळी आपल्या आगामी “83′ चित्रपटच्या प्रमोशन निमित्ताने रणवीर सिंह सामना पाहण्यासाठी इंग्लंडला गेला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. भारताने मिळवलेल्या विजयाच्या आनंदात रणवीर सिंहने क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत काढलेला एक फोटो ट्‌विट केला. या ट्‌विटच्या खाली त्याने “ईट स्लीप डॉमिनेट रिपीट’ असे कॅप्शन दिले. या ट्‌विटमुळे रणवीर सिंहला डब्ल्युडब्ल्युई या खेळातील ब्रॉक लेन्सरचे वकिल असलेले पॉल हेमन यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

रणवीरने केलेल्या ट्विटवर पॉल हॅमन याने आक्षेप दर्शवला आहे. ब्रॉक लेसनर याने डब्ल्युडब्ल्युई रेसलमेनियामध्ये सुपरस्टार अंडरटेकरला हरवले होते. आपल्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्याने “ईट स्लीप डॉमिनेट रिपीट’ असा कोट वापरण्यास सुरुवात केली. या कोटवर माझा कायदेशीर हक्क असल्याचा व तशी कायदेशीर नोंदणी केल्याचा त्याने दावा केला आहे. हा कोट परवानगी न घेता रणवीरने वापरल्याच्या आरोपाखाली त्याला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. या आधी असाच काहीसा प्रकार भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंहच्या बाबतीतही घडला होता. धोनीने “इट स्लीप फिनिश गेम रिपिट’ असे ट्विट केले होते. या ट्विटवरही पॉल हॅमनने आक्षेप दर्शवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.