राजुरी : जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील उंचखडक रस्त्याच्या कडेला विद्यानगर परिसरात फुललेल्या रानवेली सध्या रस्त्याने प्रवास करणार्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत.
राजुरी गावापासून जवळच असलेल्या विद्या विकास मंदिर या विद्यालयाच्या रस्त्यावर सध्या रानवेली वनस्पती फुललेल्या आहेत. दरवर्षी हिवाळा ऋतूमध्ये रानवेली बहरलेल्या दिसतात.
त्यावर हजारो फुले तसेच लाखो कळ्या दिसत आहेत. तसेच पक्ष्यांचा चिवचिवट व वेगवेगळे जातीचे रंगीबेरंगी फुलपाखरे सध्या या रानवेलींवरती मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच विद्या विकास मंदिर उच्च माध्यमिक विद्यालय असल्यामुळे हजारो विद्यार्थी या रस्त्याने प्रवास करतात. विद्यार्थ्यांसह रस्त्याने प्रवास करणार्या प्रवाशांचे बहरलेल्या रानवेली वनस्पती सध्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत.
तर काही निसर्गप्रेमी क्षणभर थांबून फुललेल्या रानवेलींच्या फुलांचा आनंद घेत आहेत. तर काहीच जण येथे सेल्फी काढण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. विद्यालय तसेच प्राथमिक शाळा जवळ असल्यामुळे शाळेतील हजारो विद्यार्थी तसेचया रस्त्याने प्रवास करतात त्यामुळे वर्दळ असलेले ठिकाण असून येथील रानवेलीची फुललेले फुले पाहून सर्वच आकर्षित होत आहेत. सध्या या परिसरात ही फुले सर्वांचेच लक्ष वेधून घेत असल्याची माहिती प्राचार्य जी. के. औटी यांनी सांगितले.
राजुरी (ता. जुन्नर) : येथील उंचखडक रस्त्याच्या कडेला भरलेल्या रानवेली वनस्पती.