“83’मधील रणवीरचा संघ तयार?

निर्माता-दिग्दर्शक कबीन खान याचा 1983मधील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय संघावर आधारित “83’साठी रणवीर सिंह याने जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच मोठया पडद्यावर विश्‍वचषक विजेता बनण्यासाठी संपूर्ण संघ सज्ज झाला आहे.

कर्णधार कपील देवची भूमिका साकारणा-या रणवीरचा संघ जवळपास निश्‍चित झाला आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून पंकज त्रिपाठी याची एंट्री झाली असून आता सुनील गावस्करच्या भूमिकेत ताहिर राज भसीन झळकणार आहे. याशिवाय चित्रपटात अनेक नवाद्दित कलाकारांचा समावेश आहे. ताहिरने राणी मुखर्जीसोबत “मर्दानी’मध्ये उत्कृष्ट अभिनय केला होता.

या चित्रपटाच्या शुटिंगपूर्वी रणवीर सिंहसह सर्वांना मोहाली येथे ट्रेनिंग देण्याची योजना आहे. या ट्रेनिंगच्या सुरुवातीस संपूर्ण संघ सकाळी 6 वाजात मैदानावर एकत्रित 3 तास सराव करणार आहेत. या सरावावेळी विश्‍वचषक जिंकणा-या संघातील खेळाडू बलविंदर सिंह संधू स्किल्स आणि स्टाइलबाबत मार्गदशन करणार आहेत.

दरम्यान, चित्रपटात कपिल देवची भूमिका साकरणारा रणवीर सिंहचा लुक पाहिला असता त्याला ओळखने जरा कठिणच आहे. कारण, त्याचे केस हे कपिलसारखे कुरुळे करण्यात आले आहेत. या चित्रपटातील अन्य कलाकारांचे नाव निश्‍चित झाले असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.