अलौकिक देसाईंनी “सीता’ या आपल्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. यामध्ये सीतेच्या दृष्टीकोनातून रामायणाची कथा पुन्हा एकदा सादर केली जाणार आहे.
या सिनेमातील सीतेच्या रोलसाठी करीना कपूर किंवा आलिया भट यांच्या नावाचा विचार केला जातो आहे.
मात्र त्यातील बाकीचा तपशील निश्चित होण्यापूर्वीच रणवीर सिंहने या सिनेमात रावणाचा रोल करण्याची तयारी दर्शवली आहे.
हा सिनेमा मोठ्या बजेटसह तयार केला जाणार आहे. याचे प्रॉडक्शन “बाहुबली’इतके मोठे असणार आहे, असे काही निकटवर्तीयांनी सांगितले.
जर करीनाची निवड झाली आणि रणवीरच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले, तर रणवीर आणि करीना प्रथमच एका सिनेमामध्ये एकत्र दिसण्याची शक्यता आहे. “राम लिला’मध्ये ते दोघे एकत्र काम करणार असे प्राथमिक नियोजन होते.
मात्र प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाही. रामायणावर आधारित या सिनेमामध्ये व्हीएफएक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला असेल.
या रावणाच्या रोल व्यतिरिक्त बहुचर्चित “83’म्ध्ये रणवीर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या रोलमध्येही दिसणार आहे. याशिवाय “सर्कस’ आणि “जयेशभाई जोरदार’मध्येही तो असेल.