बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सध्या बायोपिक आणि रिमेक चित्रपटांचा दौर सुरू आहे. सध्या अनेक जुन्या सुपरहिट चित्रपटांचा रिमेक साकारण्यात येत आहे. अभिनेता रणवीर सिंह देखील एका चित्रपटामुळे चर्चेत आहे. जो 1982मध्ये रिलीज झालेल्या “अंगूर’चा रीमेक आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहेत. यात रणवीर सिंह हा डबल रोल साकारणार आहे. तसेच यात जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांची नावे निश्चित झाल्याचे समजते.
असे म्हटले जात आहे की या दोन अभिनेत्रींचा ट्रॅक चित्रपटामध्ये एक गोंधळ निर्माण करेल, ज्यामुळे चित्रपटाला एक तडका बसणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच पूजा आणि जॅकलिन रणवीरसोबत झळकणार आहे. या दोन्ही अभिनेत्रींचे पात्र खूपच चांगल्या पद्धतीने रंगविण्यत आले आहे.
दरम्यान, “अंगूर’ हा कॉमेडी चित्रपट 1982मध्ये प्रदर्शित झाला होता. याचे डायरेक्शन गुलजार यांनी केले होते. यात संजीव कुमार आणि देवेन वर्मा या दोघांचे डबल रोल होते. या कॉमेडी चित्रपटाला आजही चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.