रणवीरचा “83′ प्रथम थिएटरवरच रिलीज होणार

रणवीर सिंह लीड रोलमध्ये असलेला “83′ सर्वात पहिल्यांदा थिएटरलाच रिलीज होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो पहिल्यांदा रिलीज केला जाणार नाही. सध्या सगळे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवरच रिलीज केले जात असल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना ते सहज बघता येऊ शकत नाहीत. त्यामुळे “83′ बाबत आवर्जुन हा निर्णय घेतला गेला आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे इतर अन्य सिनेमांप्रमाणे “83’चे रिलीजदेखील तुर्तास स्थगित करून ठेवले गेले आहे. आणखीन काही दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन मगच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे “83’चे दिग्दर्शक कबीर खाननी इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसर “83′ हा सिनेमा 10 एप्रिलरोजी रिलीज केला जाणार होता. भारतीय क्रिकेट संघाने 1983 साली पहिल्यांदा विश्‍वचषक जिंकला होता.

त्या ऐतिहासिक कामगिरीला “83’द्वारे पुन्हा एकदा जिवंत केले जाणार आहे आणि तत्कालिन कर्णधार कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग करतो आहे. बऱ्याच दिवसांनी क्रिकेटवरील सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना तो सहज बघता यावा म्हणून थिएटरवरच पहिल्यांदा रिलीज केला जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.