मुंबई – अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या आगामी ‘८३’ चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. १९८३ मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकाचा थरार पुन्हा एकदा या चित्रपटातून पडद्यावर मांडला जाणार आहे. रणवीर या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर, दीपिका पदुकोण ही लग्नानंतर पहिल्यांदाच त्याच्यासोबत ऑनस्क्रिन पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. अलिकडेच या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. या चित्रपटाच्या रॅपअप पार्टित या दोघांनी धमाल डान्स केला.
View this post on Instagram
दरम्यान, या दोघांचेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्टीत चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान देखील आपल्या पत्नीसोबत उपस्थित होते. दीपिका आणि रणवीर दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. दोघांचीही जोडी चाहत्यांमध्येही लोकप्रिय आहे. ‘८३’ चित्रपटात दीपिकाची भूमिका अगदी लहान असणार आहे. पुढच्या वर्षी १० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.