मुंबई – अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या आगामी ८३ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. १९८३ मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकाचा थरार या चित्रपटातून पडद्यावर मांडला जाणार आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील सेटवरचे फोटो त्याने याआधीही शेअर केले आहेत. आता त्याने एका सीनचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो कपिल देव यांचा प्रसिद्ध नटराज शॉट खेळताना तो दिसत आहे.
NATRAJ SHOT ? #RanveerAsKapil ?? @therealkapildev @kabirkhankk @deepikapadukone @Shibasishsarkar @madmantena #SajidNadiadwala @vishinduri @RelianceEnt @FuhSePhantom @NGEMovies @vibri_media @ZeeMusicCompany pic.twitter.com/RQDlyOKtas
— Ranveer Singh (@RanveerOfficial) November 11, 2019
या फोटोमध्ये तो हुबेहुब कपिल देवसारखा दिसत आहे. चाहत्यांनीही त्याचे या भूमिकेसाठी तोंडभरुन कौतुक केले आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, दीपिका लग्नानंतर पहिल्यांदाच त्याच्यासोबत ऑनस्क्रिन पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. एप्रिल 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर व्यतिरिक्त आर. बद्री, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, पंकज त्रिपाठी या कलाकारांचाही समावेश आहे.