रणवीर सिंहचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; फॅन्सनी केल्या भन्नाट कमेंट्स….

करोनामुळे दोन वर्षे प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेला अक्षयकुमारचा “सूर्यवंशी’ चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. त्यापाठोपाठ “सिम्बा’ आणि “सिंघम’देखील रांगेत आहेत. 

यामुळे सोशल मीडियावर याविषयी बरीच चर्चा आहे. पण आता चित्रपट रिलीज होण्याआधी रणवीर सिंहचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने नाचताना स्वतःच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

या व्हिडिओमध्ये अक्षयकुमार आणि रणवीर सिंह चित्रपटाच्या सेटवर पोलिसांच्या गणवेशात दिसत आहेत. या दरम्यान, रणवीर अक्षयकुमारच्या “बाला-बाला’ गाण्याचे सिग्नेचर स्टेप शिकताना दिसत आहे.

दोन्ही स्टार्स पूर्ण एनर्जीने डान्स करतात. पण मध्येच रणवीरचा हात चुकीच्या ठिकाणी गेला आणि वेदनांमुळे त्याने डान्स बंद केला.

मग सेटवर सगळे हसायला लागतात. हा व्हिडिओ अक्षयकुमारने स्वतः त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा मजेदार व्हिडिओ शेअर करत अक्षयकुमारने एक मजेदार इशाराही दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.