मुंबई- बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांची जोडी हिट मानली जाते. ब्लॉकबस्टर “सिम्बा’पासून रणवीर द्वारा प्रचारित एका नूडल ब्रॅंडच्या जाहिरातीपर्यत रोहितने अनेक यादगार आठवणी दिल्या आहेत. ही जोडी पुन्हा एकदा एका जाहिरातीत एकत्रित आली आहे. जी ऍक्शनसाठी ओळखली जाते.
आपल्या ग्रॅंड स्केल आणि प्रत्येकाच्या मनाचे ठोके वाढविणा-या ऍक्शन सीक्वेंससाठी प्रसिद्ध असलेल्या रोहितने एका इंस्टेंट नूडल कंपनीच्या जाहिरातीसाठी निर्मितीसह डायरेक्शनचे संपूर्ण काम सांभाळले आहे. या जाहिरातीमध्ये रोहित शेट्टीसह काम करण्यासाठी रणवीर सिंह खूपच उत्साहित आहे. रणवीर म्हणाला, रोहित सरांसोबत हाय-ऑक्टेन ऍक्शन सीक्वेंसची शूटिंग सुरू करताना खूपच आनंद होत आहे.
अखेरच्या वेळी “सूर्यवंशी’च्या क्लायमॅक्ससाठी ऍक्शन शूट केले होते. यानंतर पुन्हा एकदा ऍक्शन सीन करताना मज्जा आली. दरम्यान, रोहित आणि रणवीर यांनी या जाहिरातीच्या टीझरमधील एक फोटो पोस्ट केला होता. यावर रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, एका नूडलची जाहिरात आम्ही अशी शूट केली आहे.
त्यावर रोहितने बोल्ड अक्षरात लिहिले की, अहो, हा माझ्या चित्रपटाचा क्लायमॅक्स नाही. फक्त एका नूडलची जाहिरात शूट करत आहे. वर्कफ्रंटाबाबत सांगायचे झाल्यास रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी सध्या “सर्कस’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. तसेच रणवीर सिंहचा “83′ हा चित्रपट 4 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.