बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे तो खूपच चर्चेत आला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला ज्यात तो पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. यात तो खिडकीकडे पाहत साइड लुक देताना दिसतोय.
रणवीरने हा फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी त्यांच्या कमेंट्स करण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, खूपच खडतर. तर अन्य एकाने पोस्ट केले की, तू खूपच हॅंडसम दिसत आहे. तर एक चाहत्याने त्याला टॅग करत लिहिले, हॅंडसम बॉय.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, रणवीर आगामी बहुप्रतीक्षित कबीर खान यांच्या 83 चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 1983मधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर आधारित आहे, जो विश्वचषक भारताने जिंकला होता. यात रणवीर हा कपिल देवची भूमिका साकारत आहे. याशिवाय तो जयेशभाई जोरदार या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.