बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त रणवीरने त्याचा आगामी चित्रपट ’83’मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. रणवीरचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्याला कपील देव यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक होते. आता रणवीरनेच त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘माझ्या आयुष्यातील खास दिनानिमित्त, तुमच्यासाठी कपिल देव यांच्या भूमिकेतील माझा लूक’ असे कॅप्शन दिले आहे. रणवीरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या फोटोमध्ये रणवीर हुबेहुब कपिल देव यांच्या सारखा दिसत आहे.
कबीर खान निर्मित “83′ हा चित्रपट 1983 साली झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर आधारित असून ही विश्वचषक स्पर्धा अनपेक्षीतरित्या भारताने जिंकली होती. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिका साकारत आहे. यात तो माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.
या चित्रपटात रणवीर सिंहशिवाय साकिब सलीम, आर. बद्री, हार्डी संधू, चिराग पाटील, पंकज त्रिपाठी, अम्मी विर्क आणि साहिल खट्टर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.