मुंबई – रणवीर सिंग हा स्टाईल आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे.आपल्या अतरंगी गेटअपमुळे रणवीर अनेकदा चर्चेत असतो. स्टायलिश वेशभूषा करण्याच्या नादात अनेकदा नेटकरी त्याला ट्रॉल देखील करतात. असं असलं तरी चाहत्यांना मात्र त्याची प्रत्येक स्टाईल आवडते. दरवेळी काहीतरी भन्नाट करणाऱ्या रणवीरने यावेळी पूर्णपणे न्यूड फोटोशूट करून खळबळ उडवून दिली आहे.
मॅगझीनसाठी केलं फोटोशूट
रणवीर सिंगने एका लोकप्रिय मासिकासाठी हे न्यूड फोटोशूट केले आहे. काही फोटोंमध्ये रणवीर पूर्णपणे कपड्यांशिवाय दिसत आहे. रणवीरने ही बातमी देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मस्क्युलर बॉडीसह असलेला रवीराचा लूक पाहून भले भले बॉडी बिल्डर थंड पडले आहेत. रणवीरची अशी स्टाईल या आधी कधीच पाहायला मिळाली नव्हती. हे असे फोटो पाहून तर चाहते सुद्धा चकित झाले आहेत. अनेकांनीं हे फोटो फेक असल्याचे देखील म्हंटले आहे.
.@RanveerOfficial: the Last Bollywood Superstar https://t.co/mMuFPyFP44 pic.twitter.com/eQkD3baj17
— Paper Magazine (@papermagazine) July 21, 2022
View this post on Instagram
विजय देवरकोंडा यांनीही न्यूड शूट केले
अलीकडेच साऊथ स्टार विजय देवरकोंडाही ‘लाइगर’ या चित्रपटासाठी न्यूड झाला होता. हा फोटो शेअर झाल्यानंतर सोशल मीडियावरही यावर बराच गदारोळ झाला. न्यूड फोटोशूटदरम्यान विजय हातात गुलाब घेऊन दिसला होता.