मुंबई – बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी “सर्कस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटात चार्लीची भूमिका साकारत तो धम्माल करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, तो आणखी एका खास चित्रपटात काम करणार असल्याचे वृत्त आहे.
View this post on Instagram
रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच साउथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत एक फोटो शेअर करुन सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हा फोटो शेअर करत रणवीरने महेश बाबूचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, सर्वात चांगल्या आणि सज्जन माणसांपैकी तु एक असून तुझ्याबरोबर काम करण्याचा बहुमान मला मिळाला आहे. तुला खूप-खूप शुभेच्छा.
View this post on Instagram
हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून हे दोघेजण एकत्रित काम करणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या फोटोतील सत्य समोर आले आहे. हे दोन्ही स्टार्स टार्स सॉफ्ट ड्रिंक “थंब्स अप’च्या जाहिरातीत एकत्रित झळकणार आहे. या दोघांनी नुकतेच त्याचे शूटिंग पूर्ण केले आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रणवीर सिंहचा “83′ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज करण्यात येणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोणही झळकणार आहे.
View this post on Instagram