रणवीर सिंहला आवडते राखी सावंत 

रणवीर सिंह अभिनयाबरोबरच आपल्या अजब फॅशन स्टाईलने सर्वांना चांगलाच परिचित आहे. त्याने अनेकदा आपल्या कपड्यांच्या फॅशनने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. रणवीरने मध्यतंरी एका कार्यक्रमात केलेले विधानही आश्चर्यचकित करणारे आहे. रणवीरच्या मतानुसार, राखी सावंत इंडस्ट्रीची रॉकस्टार आहे.

एका मुलाखतीदरम्यान रणवीरला विचारण्यात आले कि, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये कोणाला रॉकस्टार मानतात. यावर राखी सावंतला रॉकस्टार मानतो, असे उत्तर रणवीरने दिले. राखी मला खूप आवडते, असेही त्याने पुढे म्हंटले. यावेळी रणवीरने सांगितले कि, दीपिका पदुकोणसह आपली बहीण रितिका भवनानीशीही मी मनाने खूप जवळ आहे. मी स्वतःला चांगल्या पद्धतीने ओळखतो तेवढे कोणीच मला ओळखत नाही, असेही त्याने सांगितले.

दरम्यान, रणवीर सिंह सध्या आगामी चित्रपट ‘गल्ली बॉय’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून १४ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here