“मिस्टर इंडिया’च्या रिमेकमध्ये रणवीर सिंह

अनिल कपूर आणि श्रीदेवी या सुपरहिट जोडीने गाजवलेला “मिस्टर इंडिया’ पुन्हा एकदा पडद्यावर येण्यासाठी तयार होतो आहे. यावेळी अनिल कपूरनी केलेल्या हिरोच्या रोलमध्ये रणवीर सिंह दिसणार आहे.

तर या रिमेकचे डायरेक्‍शन “भारत’, “टायगर जिंदा है’ आणि “सुलतान’सारख्या सिनेमांचे डायरेक्‍शन करणारे अली अब्बास जाफर करणार आहे. यापूर्वी रणवीरने अली अब्बास जाफरच्या दिग्दर्शनाखाली “गुंडे’मध्ये काम केले आहे. सध्या या सिनेमाची जुळवाजुळव सुरू आहे. अली यांनी या रिमेकच्या कथानकाचा पहिला ड्राफ्ट लिहून पूर्ण केला आहे. ते सध्या मोगॅम्बोच्या रोलवर काम करत आहेत.

अमरीश पुरी यांनी अजरामर केलेल्या या रोलसाठी एखाद्या सुपरस्टारला निवडण्याचे अलीनी ठरवले आहे. श्रीदेवीने केलेल्या हिरोईनच्या रोलसाठीही एखाद्या नावाजलेल्या अभिनेत्रीला निवडायचा प्रयत्न आहे. “भारत’नंतर लगेचच अली अब्बास जाफर यांनी “मिस्टर इंडिया’च्या रिमेकचे काम सुरू केले होते. सध्या रणवीर “जयेशभाई, जोरदार’, “83′ आणि “तख्त’च्या कामामध्ये बिझी आहे. या तिन्ही सिनेमांचे शूटिंग संपल्यानंतरच तो “मिस्टर इंडिया’च्या कामाला सुरुवात करणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.