गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर “बबन’ फेम अभिनेता भाऊसाहेब शिंदे
याने “रौंदळ’ या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. हे पोस्टर पाहता एक रांगडा गडी असा भाऊसाहेब शिंदेचा लुक पाहायला मिळतो.
बाळासाहेब शिंदे यांच्या साथीने भाऊसाहेबही या चित्रपटाची निर्मिती करीत आहे.
वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांची वाहवा मिळवणारा भाऊसाहेब या चित्रपटातही काहीतरी धमाकेदार सादर करील, असे त्याच्या चाहत्यांना वाटते आहे. पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. “ख्वाडा’ या चित्रपटाद्वारे भाऊसाहेबाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. “ख्वाडा’ या चित्रपटासाठी भाऊसाहेबाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
वेगळे विषय, ग्रामीण पार्श्वभूमी आणि ग्रामीण रांगडा हिरो आजपर्यंत त्याने साकारला आहे. रौंदळ या चित्रपटाच्या पोस्टरवरील त्याचे रांगडे रूप चाहत्यांना भावले आहे.