संपूर्ण जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. कारण जगात कोरोनाचे जवळपास 17 लाख 80 हजार रुग्ण झाले आहेत. जगभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 1 लाख 8 हजारांवर (10771) गेली आहे. तर चार लाख 3 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर भारतात कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण पाहता, महाराष्ट्रात लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आलं आहे. राज्य सरकारनं सर्वांना घरी राहून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान बॉलीवूड सेलेब्स सुद्धा त्यांचा लॉकडाउन बाबत सोशल मीडियावर प्रत्येक दिवसांचे अपडेट देत आहे. अशात अभिनेता रणवीर सिंहला एक आजार असल्याचं समोर आलं आहे आणि याचा खुलासा दीपिकाच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमधून झाला आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दीपिका पदुकोण सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकतीच तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एका आजाराविषयी पोस्ट केली होती. ज्यावर रणवीर सिंहनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली होती. ज्यात त्यानं हा आजार त्याला स्वतःला असल्याचं म्हटलं होतं. दीपिकानं ज्या आजाराविषयी पोस्ट केली होती त्या आजाराचं नाव आहे हायपरसोमनिया. या पोस्टमध्ये दीपिकानं या आजाराची संपूर्ण माहिती सुद्धा दिली होती.
याशिवाय या पोस्टमध्ये तिनं स्वतःला आणि पती रणवीर सिंहला टॅग केलं होतं. या पोस्टमध्ये दीपिकानं लिहिलं, हायपरसोमनिया काय आहे. ही एक अशी कंडीशन आहे ज्यात व्यक्ती 12-15 झोपूनही त्याला थकवा जाणवत राहतो. ही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना दीपिकानं लिहिलं, हा आजार तर ओळखीचा आहे. दीपिकाची ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं, ‘हा तर मी आहे.’ बऱ्याच काळापूर्वी दीपिकानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की रणवीर 20 तास झोपू शकतो.