रणवीर सिंगच्या चाहत्या म्हणतात… ‘आम्हालाही असाच नवरा हवा’

बॉलीवूडमधील हॉट कपल म्हणून प्रसिद्ध असलेल्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात शाहीसोहळा देत विवाहबंधनात आडकले. हे जोडपे कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन हे बॉलिवूडमधील सध्याचे प्रसिद्ध जोडपे आहे. त्यांच्या प्रेमाच्या चर्चा चांगल्याच रंगतात. त्या दोघांनी त्यांच्या ऑफ स्क्रीन कॅमेस्ट्रीसह ह्रदये जिंकणे सुरू केले आहे. हे जोडपे अनेक कार्यक्रमात प्रेम व्यक्त करताना दिसले. अलीकडेच मुंबईतील एका लग्नात हे दोन कलाकार दिसले होते आणि त्यांचे चाहते विविध प्लॅटफॉर्मवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यापासून स्वत: ला रोखू शकले नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर रणवीर सिंगचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये रणवीरने चक्क त्याची पत्नी दीपिकाच्या चप्पल सांभाळल्या आहेत. मुंबईतील एका लंग्नसमारंभात दीपिकाच्या चप्पल रणवीरच्या हातात होत्या त्यामुळे त्यांच्या फिमेल चाहत्यांनी आपल्यालाहि रणवीर सारखा नवरा हवा म्हणून सोशल मीडियावर म्हटले आहे.

काहीदिवसांपूर्वी  रणवीरने दीपिकासाठी लग्नाच्या 3 महिन्यानंतर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. आपल्या वाढदिवशी दीपिकाने तिची वेबसाईट लॉन्च केली होती. रणवीर सिंगचा या वेबसाईटवरचा संदेश सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने या पोस्टमध्ये दीपिकाचे भरभरुन कौतुक केले आहे.

त्याने या पोस्टमध्ये, दीपिका अतिशय चांगली व्यक्ती असून आता ती माझी अर्धांग्नी आहे, म्हणून मी हे सर्व नाही लिहित आहे. पण मी तिला वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमध्ये खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. मी जगातील सर्वाधिक नशिबवान पती आहे. तिने मला चांगला पुरूष बनण्यासाठी प्रेरित केले. ती माझ्या आयुष्याचा प्रकाश आहे, असल्याचे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर रणवीरची ही पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्‌स दिल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.