Gully Boy 2 | अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या ‘गली बॉय’ या चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर आता या चित्रपटाच्या सीक्वेलची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आता यात रणवीर आणि आलियाचा पत्ता कट होणार असल्याचे म्हंटले जात आहे.
अर्जुन वरेन सिंह गली बॉयच्या सिक्वेलचे दिग्दर्शन करू शकतात. या चित्रपटाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आलिया आणि रणवीर सिंग या चित्रपटात दिसणार नसून, यावेळी चित्रपटात एक नवीन जोडी दाखवण्यात येणार आहे, जी आतापर्यंत कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. Gully Boy 2 |
रणवीर सिंग, आलिया भट्ट, सिद्धांत चतुर्वेदी, कल्की कोचलिन, विजय वर्मा याशिवाय अनेक कलाकारांनी जोया अख्तर दिग्दर्शित गली बॉयमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. 2019 चा हा चित्रपट मुंबईतील एका तरुणाबद्दल दाखवण्यात आला होता, ज्याला रॅप संगीताची आवड आहे.
या चित्रपटाला चाहते आणि समीक्षकांकडून खूप प्रेम आणि प्रशंसा मिळाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचा सिक्वेल बनवला जाणार असून त्यासाठी विकी कौशल आणि अनन्या पांडे यांच्याशी चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप सिनेमाबाबतीत आणि कास्टिंगबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
विकी कौशल आणि अनन्या पांडे अद्याप एकत्र पडद्यावर झळकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तर दुसरीकडे रणवीर-आलियाच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते.
हेही वाचा:
अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एंट्री, तब्बल 25 वर्षांनी एकत्र काम करणार