मुंबई – बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया कपूर लवकरच चित्रपट निर्माता करण जोहरच्या आगामी “रॉकी और राणी की प्रेम कहानी’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे सध्या दिल्लीत शुटिंग सुरू आहे.
या चित्रपटासंबंधी एक खास गोष्ट समोर आली आहे. “रॉकी और राणी की प्रेम कहानी’मधील ही खास गोष्ट म्हणजे रणवीर आणि आलिया हे ऑन स्क्रीन एकमेकांसोबत किसिंग किंव इंटीमेट
सीन करू इच्छित नाही. असे सांगितले जात आहे की, रणवीर आणि आलिया हे आपले पार्टनर्स दीपिका आणि रणबीर कपूर यांच्याशी खूपच कमिटेड आहेत.
परंतु, यापूर्वी रणवीर आणि आलिया यांनी “गली बॉय’मध्ये किसिंग आणि इंटीमेट सीन केलेले आहेत. या सीन्सची चाहत्यांनीही तोंड भरून कौतुक केले होते. दरम्यान, “रॉकी और राणी की
प्रेम कहानी’ या चित्रपटाद्वारे दिर्घ काळानंतर करण जोहर हा दिग्दर्शनाकडे पुन्हा वळला आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलियासह धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी आदी कलाकार झळकणार आहेत.