खेळ व शिक्षण यातील दरी दूर करणारा चित्रपट ‘रानु’   

पुणे: आज पालकांनी आपल्या पाल्ल्यांना खेळामध्येही ‘करिअर’ करता येते याची शिकवण देत त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. शिक्षण तर महत्वाचे आहेच परंतु खेळामुळेसुद्धा मुलांमध्ये, शारीरिक, मानसिक विकास होतो हे सत्य नाकारता येत नाही. सर्वच मुले स्पर्धापरीक्षांमधे अव्वल येणार नाहीत परंतु लहानपणी केलेला खेळ-अभ्यास आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी मदत करते हे पालकांच्या मनी बिंबवणे गरजेचे आहे.

निर्मात्या स्वप्ना कदम व लेखक, दिग्दर्शक कय्युम काझी यांनी एकत्र येऊन एक मराठी चित्रपट बनविला आहे जो आपल्याकडील खेळांबाबत औदासिन्यतेकडे अंगुलीनिर्देश करतो. चित्रपटाचे नाव ‘रानु’ असून तो एका मुलीच्या धावण्याचा उत्कट आसक्तीबद्दल भाष्य करतो. ‘रानु’ चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला पीकल एंटरटेनमेंट्स संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करत आहे.

‘रानु’ ची निर्मिती स्व एंटरटेनमेंट्स च्या बॅनरखाली झाली असून स्वप्ना कदम यांनी निर्मितिसूत्रे सांभाळली आहेत. कय्युम काझी यांनी कथा, पटकथा, संवाद लिहिले असून दिग्दर्शनची भूमिकाही बजावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.