प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार रानू मंडल यांच्या बायोपिक

मुंबई : पश्चिम बंगालधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडल या महिलेचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता.  रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले.

तिच्या या आवाजाला आता ऑफिशियल ओळख मिळाली आहे. हिमेश रेशमियाच्या  ‘हैप्पी हार्डी एंड हीर’ या चित्रपटात पहिले गाणे गात तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळविली आहे. मागील काही महिन्यामध्ये सोशल माध्यमांमध्ये सर्वात जास्त सर्च केलेल्या व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव होते, मात्र काही दिवसांपासून त्या अचानक कुठे गायब झाल्या आहेत.

रानू मंडल या सध्या सोशल मीडियावर कुठेच दिसत नसल्यानं त्या कुठे आहेत आणि काय करत आहेत याविषयी जाणून घेण्याची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की रानू मंडल या सध्या प्रचंड काम करत आहेत. त्यांचं ऑफिशियल फेसबुक पेज नुकतंच तयार करण्यात आलं असून त्यावरुन त्यांचा कामविषयीचे अपडेट शेअर केले जात आहेत.

याशिवाय रानू यांच्या बायोपिकचं सुद्धा काम सुरू असून त्यामुळे रानू सध्या त्यांच्या कामात बीझी आहेत. दरम्यान आपलं अर्ध्याहून जास्त आयुष्य कष्टात घलवणाऱ्या रानू यांना नुकताच त्यांचा पासपोर्ट मिळाला आहे.

एवढंच नाही तर त्यांचं फेसबुक पेज 2 लाखांहून जास्त लोकांनी लाइक केलं आहे. रानू मंडल यांच्या यशात महत्त्वाचा वाटा असलेला एतींद्र चक्रवर्ती त्यांचं फेसबुक पेज हॅन्डल करत असून तो फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून रानू यांचे अपडेट्स त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.