राणू मंडल पून्हा प्रकाशझोतात येणार; या बायोपिकमध्ये गाण्यांची संधी

मुंबई- राणू मंडल यांंना ओळखता का?, असं विचारलं तर अनेकांच्या तोडातून एकच उत्तर येईल ते म्हणजे त्या गाणी गाणाऱ्या ना? होय त्याच गाणे गाऊन रातोरात स्टार झालेल्या रानू मंडलला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले. मात्र, यानंतर त्यांच्या काही वागणुकीमुळे पुढे त्यांना काम मिळेनासे झाले होते.

मात्र आता त्या एका बायोपिकमध्ये गाणं म्हणणार असल्याचं समजतंय. लॉकडाऊनचा फटका त्यांनाही बसला आहे. रामायणातील ‘सीता’ अर्थात अभिनेत्री दीपिका चिखलिया धावून आली आहे. लॉकडाऊन काळात हालाखीची परिस्थिती ओढवलेल्या रानू मंडल यांना दीपिकाने त्यांच्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे

सरोजिनी नायडू यांचा बायोपिक ‘सरोजिनी’मध्ये त्या मुख्य  भूमिकेत असलेली दीपिका चिखलिया . दीपिका चिखलियाच्या या चित्रपटामुळे सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल यांना पून्हा संधी मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.